बाप सुसंस्कृत पिढी घडवणारी आदर्श व्यक्ती…. निवृत्त शिक्षक स.ध. भावसार यांचे प्रतिपादन.
एरंडोलला आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न….

प्रतिनिधी एरंडोल येथे ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये आदर्श बाप गौरव सोहळा कार्यक्रमात बाप सुसंस्कृत पिढी घडवणारी एक आदर्श व्यक्ती असून कुटुंबाला पुढे नेणाऱ्या अशा आदर्श बापमाणसांचा आज सन्मान होणे काळाची गरज आहे. मुलांनी त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्यांना भरभरून प्रेम द्यायला शिकलं पाहिजे असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा प्रसिद्ध पत्र लेखक सदानंद भावसार यांनी केले. ते येथील ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे बाप महोत्सवांतर्गत आयोजलेल्या आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, प्रा. एन ए पाटील, निवृत्त तहसीलदार अरुण भाऊ माळी, राजेश साळी,निवृत्त शिक्षक पंडित सोनवणे, राजेश साळी, वि.का. सोसायटीचे संचालक बाळासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत महाजन, एरंडोल शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे,प्रगतशील शेतकरी अरुण पाटील, वनविभागाचे हवालदार डी ए पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शहरातील कष्टमय जीवन जगत कुटुंबाला प्रगतीपथावर नेणाऱ्या 22 वडिलांचा आदर्श बाप गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते शाल ,बुके व गौरव पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, बाप महोत्सव हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा असून माणूस जेव्हा बाप होतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने बापाची वेदना कळते. त्याला आनंदी व सुखी कसं ठेवता येईल याचाही विचार मुलांनी करावा असे सांगून त्यांनी ऊर्जा संस्थेच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितले की, आई वडिलांची सेवा ही ईश्वरीय सेवा आहे, त्यांच्या सेवेत कुठलीही कसर ठेवू नका, त्यांना प्रेम व आदर द्या. त्यांची सेवा हीच खरी भक्ती आहे. यावेळी आयुष्यभर कष्टाची पूजा बांधणाऱ्या खंडू महाजन, परशुराम महाजन, निवृत्त शिक्षक पी.ओ.बडगुजर, निवृत्त ग्राम विस्तार अधिकारी गणेश पाटील, भगवान महाजन, नामदेव पाटील, दोधू चौधरी, तुकाराम महाजन, निवृत्त पोलीस निरीक्षक रघुनाथ सुतार, वसंत वाणी, भगवान महाजन,पंडित महाजन, आधार महाजन, धनसिंग पाटील, प्रकाश पाटील, नानाभाऊ मिस्तरी, पंडित साळी, नवल चव्हाण, संतोष महाजन, रामदास महाजन, सुरेश भावसार यांचा आदर्श बाप गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी तर आभार निंबा बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अंजली महाजन,सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव विनायक कुलकर्णी, दिनेश चव्हाण, संदीप पाटील, ममता सुतार, गणेश महाजन, रवींद्र महाजन, दीपक शेंडे, कल्याणी महाजन, तेजस्विनी महाजन आदींनी परिश्रम घेतले.