जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे एक लाख 51 हजार बक्षिसाच्या मानाची कुस्ती चा विजेता ठरला पुण्याचा पहिलवान  रविराज चव्हाण.

प्रतिनिधी एरंडोल – येथे जय गुरु व्यायाम शाळेतर्फे रा.ती.काबरे विद्यालयाच्या मैदानावर २० एप्रिल २०२५ रविवार रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत कुस्त्यांचे सामने पार पडले. लहान मोठ्या जवळपास २०० कुस्त्यांचे सामने पार पडले. एक लाख 51 हजार ची मानाची कुस्ती पुण्याचा पहिलवान रविराज चव्हाण याने पुण्याचा च मल्ल समीर शेख याला अवघ्या पाच ते सात मिनिटात आसमान दाखवले. विजेता कुस्तीगीर रविराज चव्हाण यांना रोख बक्षीस देण्यात आले तसेच मान्यवरांनी आखाड्यात येऊन विजेता मल्ल रविराज चव्हाण यांचे अभिनंदन केले.
           आखाडा पूजन उद्योजक प्रसाद काबरा, भगवान महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, एडवोकेट ओम त्रिवेदी, रमेश महाजन, राहुल तिवारी, कुणाल महाजन, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
             पंच म्हणून युवराज पैलवान दशरथ महाजन संजय महाजन सतीश परदेशी बंटी चौधरी सिद्धार्थ परदेशी आप्पा पैलवान यांनी कामकाज पाहिले.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश परदेशी किशोर महाजन सिद्धार्थ परदेशी बंटी चौधरी मुकुंदा पाटील गोलू पाटील धनराज पाटील  यांच्यासह जय गुरु व्यायाम शाळेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
              यावेळी मानाची कुस्ती अवघ्या पाच ते सात मिनिटात होऊन रविराज चव्हाण यांनी बाजी मारली. धुळे ,शिरपूर भडगाव, चाळीसगाव, हुबळी, आदी गावाहून आलेल्या कुस्तीगिरांनी कुस्ती सामन्यांमध्ये सहभाग घेतला .
          सदर कुस्त्यांचे सामने पाहून कुस्ती शौकिनांचे डोळ्याचे पारणे फिटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button