ताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात सन्मान….!

प्रतिनिधी एरंडोल –  युवा संवाद सामाजिक संस्था, पुणे व कार्टुन कंबाईन्स संस्था,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या तीन दिवसीय ‘ पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शन २०२५ चे आयोजन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले होते.तिसऱ्या दिवशी १९ जानेवारी २०२५ रोजी सुप्रसिद्ध युवा नेते आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२५ निमित्ताने ॲग्रोवनचे व्यंगचित्रकार लहू काळे, बोलक्या रेषाकार घनश्याम देशमुख,दै.प्रभातचे व्यंगचित्रकार धनराज गरड,मार्मिकचे व्यंगचित्रकार शरद महाजन, मार्मिकचे मुखपृष्ठावर गौरव सर्जेराव,बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजक व्यंगचित्रकार अमित पापळ, हेमंत कुंवर,ऋषिकेश उपालवीकर,यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
         महाराष्ट्रातील तसेच देशविदेशातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या काही हसायला तर काही विचार करायला लावणारी व्यंगचित्रे पाहण्यासाठी रसिक पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला.सुमारे २८० नामवंत व्यंगचित्रकारांची चित्रे यात मांडण्यात आली होती.
       या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी झाले.दै.प्रभातचे संपादक अविनाश भट,ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी,जेष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, बोलक्या रेषाकार घनश्याम देशमुख,सकाळ ॲग्रोवनचे लहु काळे,व्यंगचित्रकार शरद महाजन,गौतम दिवार,गणेश जोशी आदी उपस्थित होते. यावेळी या व्यंग्यचित्र महोत्सवाचे संयोजक, व्यंग्यचित्रकार धनराज गरड यांनी आपल्या प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले.
           ‘कार्टुनिस्ट कंबाईन’ या संस्थेच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. शनिवारी (दि. १८) आणि रविवारी (दि. १९) व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके आणि परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले होते.यात व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख, मार्मिकचे गौरव सर्जेराव यांनी व्यंगचित्र प्रात्यक्षिके सादर केली.त्यावेळी रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.राजकीय, सामाजिक, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान, प्रदूषण, पाणीटंचाई, अशा विविध विषयांवर मार्मिक व्यंगचित्रे मांडण्यात आली होती.बहुसंख्य प्रेक्षकांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव आयोजित केल्याबद्दल उत्स्फूर्तपणे दाद देणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन दिपक कसबे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button