एरंडोल शेगाव बस मध्ये विचारांचा जागर
प्रतिनिधी – येथील राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी आज जामनेर कडे प्रवास करतेवेळी एरंडोल ते शेगाव या एसटी बस मध्ये संवाद मनामनाशी या विषयावर उपस्थित प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आई वडील यांचा जीवनात असलेलं महत्त्व तर जीवन किती सुंदर आहे व प्रत्येकाला आनंदी कसं जगता येईल या विषयावर संवाद साधत त्यांनी उपस्थित प्रवाशांना आपलंसं केलं. प्रवाशांनी ही त्यांच्या या आगळ्या वेगळ्या अभिनयाचे कौतुक केले. बस क्रमांक एम एच १४ बीटी १८७८ या एसटी बसमधील प्रवाशांना महाजन यांच्या विचारांचा हा जागर मनस्वी भावला. यावेळी प्रवाशांनी त्यांचे टाळ्या वाजून भरभरून कौतुक ही केले. यावेळी एसटीच्या वाहक लीना महाजन, साहित्यिक निंबा बडगुजर व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वीही प्रवीण महाजन यांनी धावत्या एसटी बस बरोबरच भुसावळ नाशिक पॅसेंजर, महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वें मध्ये नका करू आत्महत्या, बेटी बचाव बेटी पढाव, व्यसन मुक्त अभियान, नेत्रदान वेगवेगळ्या सामाजिक आशयांवर लोकांचे प्रबोधन केले आहे.