रवंजे बुद्रुक येथील एकाची गिरणा पाट चारित उडी मारून आत्महत्या .
प्रतिनिधी एरंडोल:- तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथील सुनील हिरालाल जगताप वय 33 वर्ष या इसमाने गिरणा कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २१ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अनिल मराठे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे.
२० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनील जगताप याने गिरणा कालव्यात उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली . कालव्याला पाणी सुरू असल्यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला पाटाचे पाणी बंद केल्यावर शोध कार्याला पुन्हा सुरुवात झाली असता मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सुनील जगताप हा बेशुद्ध अवस्थेत खर्ची शिवारात ज्ञानेश्वर महाजन यांच्या शेता नजीक गिरणा कालव्यात मिळून आला. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात खाजगी वाहनाने नेले असता तपासणी अंति तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.