एरंडोलला राजमाता जिजाऊ महिला मंडळाचा आगळावेगळा, प्रेरणादायी कार्यक्रम आणि हळदी-कुंकू
समाजातील महिला उद्योजिका, खडतर जीवनप्रवास करणार्या महिला रणरागिणींचा झाला सन्मान
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील जिजाऊ महिला मंडळ आणि जिजाऊ बिग्रेडतर्फे अनोख्या पध्दतीने हळदी-कुंकू, सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान आ. अमोल पाटील यांच्या मातोश्री सौ. नलिनीताई चिमणराव पाटील, चंद्रकला जैन होत्या.
येथील श्रीसाई-गजानन मंदिरात आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात उद्योजिका हेमांगी राजेश पाटील धुळे, प्रमिला विलास भोसले एरंडोल तर प्रमुख वक्त्या म्हणून अॅड. प्रतिभा वसंत पाटील कासोदा, पुष्पाताई बाविस्कर, ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. रत्नमाला पाटील, आशाताई सुर्यवंशी होत्या. राजमाता मॉसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनाने कार्यक्रमास सुरूवात झाली.
कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे ज्या रणरागिनी स्त्रीया पती निधनानंतर संसाराचा गाढा कणखरपणे सांभाळतात, मुलांचे पालनपोषण करतात त्याच रणरागिनींना आजच्या आधुनिक म्हणवणार्या समाजात धार्मिक कार्यात आमंत्रित केले जात नाही. या रूढींना फाटा देत जिजाऊ महिला मंडळाने स्त्रियांना प्रथम हळदी-कुंकू आणि वाण देवून सन्मानाची शाल पांघरवली. यात हेमलता पाटील, संगीता पाटील, उज्वला पाटील आदी विधवा स्त्रियांना हळदी-कुंकू व वाण देण्यात आले.
समाजासाठी झटणार्या शोभा साळी यांना समाजभूषण पुरस्कार तर आरती महाजन यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. घरगुती उद्योगापासून मोठ्या व्यवसायापर्यंत आपल्या उद्योगाला नेणार्या हेमांगी राजेश पाटील, प्रमिला विलास भोसले यांना यशस्वी उद्योजिका म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अॅड. प्रतिभा पाटील यांनी महिलांना कायदेविषयक माहिती, महिलांना येणार्या अडचणी, त्यांचेवर होणार्या अन्याय-अत्याचा विषयक कलमानुसार माहिती तसेच तक्रार कशी करावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी सर्व महिला मंडळ अध्यक्षा शोभा साळी, आरती महाजन, रश्मी दंडवते, निशा विंचूरकर, शालिनी कोठावदे, रत्ना देवरे, शशिकला मानुधने, निलिमा मानुधने, माजी नगरसेविका आरती महाजन, वर्षा शिंदे, रेवती पाटील, छाया दाभाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रणाली भोसले, जिजाऊ वंदना मनिषा पाटील, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, प्रास्ताविक वंदना पाटील, आभार शकुंतला पाटील यांनी तर रांगोळी ज्योत्स्ना पाटील, आश्विनी पाटील यांनी काढली. भोजन आयोजिका मनिषा पाटील तर हळदी-कुंकू, वाण शिवमती शकुंतला अहिरराव यांचा साडी, शाल व पुस्तक देवून शिवमती वंदना पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी रूपाली पाटील, सपना वानखेडे, मीना काळे, माधुरी भवर, शिला पाटील, मनिषा पाटील, डॉ. गायत्री पाटील, कुसूम पाटील, प्रतिमा पाटील, सुरेखा पाटील, छाया पाटील, संगिता मोरे, ललिता पाटील, हेमलता पाटील, उज्वला पाटील, संगीता पाटील, जयश्री पाटील, पुजा भांडारकर, वर्षा पाटील, पुजा पाटील, हिराबाई पाटील, रेवती पाटील, शिला पाटील, सुनंदा पाटील, डॉ. गायत्री, वैशाली पाटील, माया इंगळे, ज्योती पाटील, उज्वला पाटील, वारूळेताई आदी उपस्थित होत्या.