जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

श्रीमती के डी पाटील इंग्लिश स्कूलची एमडीबी केमिकल कंपनीला क्षेत्रभेट….


प्रतिनिधी एरंडोल:-यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आज २४ जानेवारी रोजी एम डी बी केमिकल कंपनीला क्षेत्रभेटीचे इयत्ता ८ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
                  यावेळी विद्यार्थ्यांना केमिकल प्लांट विषयी, कामाची पद्धत, काम करत असताना सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी अशा विविध स्वरूपाची माहिती कंपनीचे मालक पंकज काबरा यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तर स्वरूपात सांगितली.
                प्राचार्य दीनानाथ पाटील, भिकान वाल्डे, रवींद्र चिंचोरे, मीना चिंचोरे, प्रणाली भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर क्षेत्र भेटीत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button