जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..


प्रतिनिधी – एरंडोल येथे  ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध शासकीय , सामाजिक , शैक्षणिक व राजकीय संस्थांतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
   शहरातील रा.ती. काबरे विद्यालयाच्या पटांगणावर शासकीय ध्वजारोहण प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी नवनियुक्त आमदार. अमोल चिमणराव पाटील , तहसीलदार प्रदीप पाटील , पो.नि. निलेश गायकवाड , मुख्याधिकारी अमोल बागुल , गटविकास अधिकारी दादाजी जाधव , तसेच विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी तथा शहरातील माजी नगराध्यक्ष देविदास महाजन , माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश महाजन , शालिग्राम गायकवाड , रवींद्र पाटील , किशोर निंबाळकर , जगदीश ठाकुर , कुणाल महाजन. परेश बिर्ला  मनोज पाटील , मनोज पाटील , डॉ. सुरेश पाटील , विठ्ठल आंधळे , डॉ . सुधीर काबरा , डॉ. राजेंद्र चौधरी ,विलास मोरे , विशाल सोनार , ईश्वर बिराडे , निकुंभ सर , संभाजी पाटील  उपस्थित होते . शहरातील विवेक शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी पथक स्काऊट गाईड गृह रक्षा दलाचे जवान पोलीस कर्मचारी असंख्य शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस , गृह रक्षक दलाचे जवान व एनसीसी पथक यांनी पथसंंचालन करून झेंड्यास मानवंदना दिली. याप्रसंगी आ. अमोल पाटील व प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांनी ऑनलाइन  फार्मर आयडी नोंदणी केल्यामुळे त्यांना  प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button