श्रीक्षेत्र कन्हेरे येथे शित शवपेटी अर्पण सोहळा उत्साहात संपन्न

एरंडोल – येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र कन्हेरे येथे प्रजासत्ताक दिन जि. प. शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. व्यावसायिक देवाजी बळीराम पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी शित शवपेटी अर्पण सोहळा देखील पार पडला.
कन्हेरे येथील रहिवासी आणि सध्या कुसूंबा (जळगांव) येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक देवाजी बळीराम पाटील यांनी आपली जन्मभूमी येथे अनेक दिवसांपासून शवपेटीसाठी होत असलेली गैरसोय ओळखून स्वखर्चाने त्यांचे वडील कै. बळीराम तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या स्वाधीन केली. यावेळी त्यांच्या हातुन जि. प. शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. शित शवपेटी अर्पण केल्याने ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलिस पाटील, ग्रामसेवक, मुख्याध्यापक यांचेसह कर्मचारी, ग्रामस्थ, तरूण मंडळ मोठ्या ुसंख्येने उपस्थित होते. देवाजी पाटील यांच्या दातृत्वाचे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.