श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री गुरुदत्त महायाग ११ यजमानांकडून सपत्नीक पूजा; दिगंबरा, दिगंबराचा जयघोष
अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री गुरुदत्त आणि श्री अनघा माता यांच्या मूर्तींची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त १४ रोजी दुपारी १२ ते ३ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत श्री गुरुदत्त महायाग अतिशय भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.
महायागाचे यजमान सृष्टी हॉस्पिटल, जळगावचे डॉ. राधेश्याम चौधरी, सेवानिवृत्त तहसीलदार आर. जी. चव्हाण, अमळनेरचे अनंत कुमार सूर्यवंशी, मितेशभाई गोसलिया, भूपेंद्र वानखेडे, प्रा. दिलीप भावसार, महेशभाऊ बडगुजर, राजेश विलास पाटील, धुळ्याचे सुनील चौधरी, जळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जी. एम. पाटील आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, भुसावळचे मिलिंद टोके हे होते.
महायागानिमित्त सजवलेली श्री दत्त भगवंतांची प्रतिमा आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली. सोबतच महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांच्या प्रतिमांचीही आकर्षकरीत्या सजावट करण्यात आली होती. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त प्रथम महायागाचे आयोजन करण्यात आले.
महायागप्रसंगी सुरूवातीला दिगंबरा दिगंबराचा जयघोष करीत श्री गणपती पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तूपूजन, योगिनी पूजन, श्री दात्त्वसर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतु:षष्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजा, स्थापित देवतांचे हवन, बलिदान होऊन पूर्णाहुती करण्यात आली. यावेळी श्री गुरुदत्त भगवंतांची स्तुतीपर भजने, भक्तिगीते गायिली गेली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महाआरतीने महायागाची सांगता झाली. याप्रसंगी भाविकांना दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आला.
मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले. त्यांना गोपाल पाठक, प्रवीण भंडारी, चेतन नाईक यांचे सहकार्य लाभले. पखवाज वादक अंकुश जोशी यांची साथसंगत केली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी उज्ज्वला शाह, पुषंद ढाके, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, जितेंद्र पाटील, रवींद्र मोरे, कार्यालय अधीक्षक भरत पाटील, अकौंटंट मनोहर तायडे, निखिल सूर्यवंशी, हरिष चव्हाण यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.