जळगावधार्मिकमहाराष्ट्र
एरंडोल आगारास विठुराया पावला,पंढरपुर यात्रे दरम्यान एरंडोल आगारास पावणे आठ लाखांचा नफा .

प्रतिनिधी एरंडोल:- आषाढी पंढरपुर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारातुन भाविकांसाठी ४३ बसेस सोडण्यात आल्या होत्या यात आगाराला जवळपास पावणे आठ लाखांचे उत्पन्न मिळाले.
यावर्षी ३२१९ महिलांनी पंढरपूर विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला. एकूण ७४७२ भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. यातून आगारास सवलत मूल्य सह ७,७५,९९२ एवढा निवड नफा आगारास मिळाला. अशी माहिती आगार व्यवस्थापक निलेश बेनगुडे, स्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांनी दिली.
पंढरपूर यात्रेसाठी आगारातील चालक वाहक यांत्रिक तसेच प्रशासकीय कर्मचारी वर्ग या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून विशेष परिश्रम परिश्रम घेतल्याबद्दल आगार व्यवस्थापकांनी सर्वांचे अभिनंदन केले.