जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित

प्रतिनिधी एरंडोल – महात्मा फुले हायस्कूल ची माजी विद्यार्थिनी कु.ज्योती यादव हीने महाराष्ट्र राज्य केसरी कुस्तीस्पर्धेत कास्यपदक मिळवून जळगाव जिल्हा सह गावाचे तालुक्याचे तसेच शाळेचे नाव रोशन केले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णासो विजय महाजन व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यामार्फत कु.ज्योती यादव हीचा यथोचीत सन्मान,सत्कार करण्यात आला.
तिला भेट स्वरूपात शाळेकडून बक्षीस देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो विजय महाजन व शिक्षक यांनी ज्योती यादव हिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मुकेश यादव, समाधान महाजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.