एरंडोल शहरात भव्य मॅरेथॉन चे आयोजन

प्रतिनिधी एरंडोल – शहरात मैत्री सेवा फाउंडेशन हि सामाजिक संस्था नेहमीच नवनवीन संकल्पना राबवून विविध शेत्रात सामाजिक काम करत असते , सध्या एक तास आरोग्यासाठी या संकल्पने अंतर्गत ” एरंडोल रन मॅरेथॉन ” चे आयोजन प्रथमच मैत्री सेवा फाऊंडेशन मार्फत एरंडोल तालुक्या करण्यात आले आहे.या उपक्रमाचे प्रयोजन त्रिवेदी फाऊंडेशन तर्फे – ॲड.श्री.ओमजी त्रिवेदी व बालाजी गृप तर्फे – श्री. प्रसादजी काबरा .
या दोन्ही दातृत्व प्रिय व्यक्तीनं मार्फत करण्यात येत जनजागृतीच्या शाश्वत हेतूने करण्यात येत आहे.
या उपक्रमात पुरुष व महिला यांचे विभक्त गट असून एक गट खुला ठेवण्यात आला आहे ज्यात एरंडोल तालुक्या बाहेरील स्पर्धक सुद्धा सहभागी होऊ शकतात आणि विशेष यात प्रत्येक गटाला वेगवेगळी आकर्षक बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आलेली आहे व स्पर्धेत स्पर्धक लकी ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आला आहे.
पुरुष गट
7KM ( वय 16 ते 35 वर्ष )
5KM ( वय 36 ते वरील सर्व )
3KM ( वय 08 ते 15 )
महिला गट
3KM ( वय 08 ते 15 वर्ष )
3KM ( वय 16 ते 35 वर्ष )
3KM ( वय 36 ते वरील सर्व )
पुरुष/महिला खुला गट
7KM (एरंडोल तालुक्याबाहेरील वय 15 वर्ष ते वरील सर्व )
तरी मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की या उपक्रमास उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवावा व आपल्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवावी
सदरील मॅरेथॉन ९ फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून रा.ती. काबरे विद्यालय एरंडोल येथून सुरू होणार आहे , मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सहभाग फी १००/- ठेवण्यात आलेली आहे त्यात स्पर्धकाला एक किट देण्यात येणार आहे त्यात (टी- शर्ट, मेडल, पाणी , ब्रेकफास्ट,गुलकोविटा,प्रथम उपचार व्हाउचर इत्यादी ) असेल आतापर्यंत सुमारे १४०० स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे तरी सर्वांना आवाहन की ३१ जानेवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल. सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी , सदरील नोंदणी खालील ठिकाणी सुरू आहे
….. नोंदणी ठिकाण….
१)मैत्री ग्राहक सेवा केंद्र
तहसील कार्यालय जवळ
96738 68883
२)मेट्रोपोलिस लॅब
माळीवाडा कॉर्नर मेन रोड
8888656640
३)एम. एस. कन्स्ट्रकशन
डॉ. बा. आंबेडकर चौक
70387 93444
४)अंबिका मेडिकल
जयहिंद चौक गांधीपुरा
9096239684
किंवा आपण वरील नंबर वर संपर्क करून नोंदणी ची लिंक सुद्धा मागऊ शकता.
मैत्री फाउंडेशन यांच्याकडून विनंती करण्यात येते की आपणास लवकरात लवकर या स्पर्धेत आपले सहभाग नोंदवावा.