जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

जातीयवादी प्रचार करणा-यांना मतदारांनी धडा शिकवला.-आमदार अमोल पाटील.

प्रतिनिधी एरंडोल-विधानसभा निवडणुकीत जातीयवादी प्रचार करणा-यांना मतदारांनी धडा
शिकवला असे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले.साळी समाज,बडगुजर
समाजासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या
सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

   विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आमदार अमोल पाटील यांचा बडगुजर
समाज,साळी समाज यासह शहरासह ग्रामीण भागातील विविध सामाजिक
संघटनांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.श्री सूर्यवंशी समस्त स्वकुळ
साळी समाज मंडळाच्यावतीने समाजाच्या सामाजिक सभागृहात आमदार अमोल पाटील
यांचा सत्कार करण्यात आला.तसेच बडगुजर समाज उत्कर्ष समाज मंडळाच्यावतीने
सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आमदार अमोल पाटील यांचा
समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार अमोल पाटील यांनी आपण
राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना कोणताही जातीयवाद केला
नाही.सर्व समाजाला बरोबर घेवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न
केला,मात्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जातीयवादी प्रचार करून
समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.जातीयवादी प्रचार करणा-या
उमेदवारांना मतदारांनी धडा शिकवला असल्याचे सांगितले.जातीय द्वेष निर्माण
करणा-यांपासून सर्वांनी सावध रहावे असे आवाहन केले.सर्वसामान्य मतदारांचा
विश्वास,प्रामाणिक कार्यकर्त्यांचे संघटन,पाच वर्षात मतदारसंघात झालेली
विकासकामे या बळावरच निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला असल्याचे
सांगितले.पाच वर्षात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व समाजघटकापर्यंत
पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मतदारसंघाची
सुरु असलेली विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.यावेळी साळी समाजाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन आमदार अमोल
पाटील यांचेहस्ते करण्यात आले.श्री सूर्यवंशी स्वकुळ साळी समाजातर्फे
अध्यक्ष सोमनाथ कासटकर,सचिव अरुण डहाके खजिनदार अशोक साळी,रामचंद्र साळी
यांचेहस्ते आमदार अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापिका
क्षमा साळी यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास किर्गीस्तानचे भारतातील
मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज
पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,भालचंद्र साळी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल
महाजन,उदयकुमार साळी,निवृत्त मुख्याध्यापक पंडित साळी,ईश्वरलाल साळी,अशोक
साळी,विलास गरुड,अशोक दिवटे,प्रकाश साळी शोभना साळी,निंबा
बडगुजर,पी.ओ.बडगुजर यांचेसह समाजबांधव उपस्थित होते.आमदार अमोल पाटील व
पदाधिका-यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत
करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button