जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण
गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अमोल वाणी यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी एरंडोल -येथील गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अमोल सुरेश वाणी यांची तर उपाध्यक्षपदी सागर अशोक चौधरी यांची सर्वांनमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे
नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत सर्वांमध्ये गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या सभासदांनी अमोल वाणी यांच्या नावाला पसंती दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी सर्व सदस्य व विविध राजकीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते निवड करण्याकामी सौ. साळुंके मॅडम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.