जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

माहिती अधिकार  समितीच्या वतीने.अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारी दिवाळी..

विशेष प्रतिनिधी पुणे – जागृत नागरी महासंघ माहिती अधिकार  समितीच्या वतीने पिपंरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी २६ या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या महानगरपालिका सफाई कामगार व घंटागाडी वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जागृत नागरिक महासंघाच्या वतीने आकाश कंदील दिवाळी भेट  देऊन सन्मान करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने महासंघाने दिवाळी साजरी केली त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त मा श्री दशरथ लिलाबाई दत्तात्रय कांबळे  साहेब यांच्या हस्ते घंटागाडीवर काम करणाऱ्या साठ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून आकाश कंदील देऊन सन्मान करण्यात आला.. श्री कांबळे साहेबांनी जागृत नागरिक महासंघाच्या कार्याचा गौरव करत दिवाळी भेट म्हणून आकाश कंदील वाटप हा उपक्रम सर्वप्रथमच शहरात होत असल्याचे सांगून महासंघा चे अभिनंदन केले त्यावेळी माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव यांनी सफाईक सफाई कर्मचारी हे खऱ्या अर्थाने शहराचे स्वच्छता दूत आहेत असे सांगून गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर माहिती अधिकार कायद्याचा कशा पद्धतीने प्रचार प्रसार करून प्रशिक्षण देतो याची माहिती दिली  सर्वसामान्य गोरगरीब नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कशा पद्धतीने माहिती अधिकाराचा 100% सकारात्मक वापर करून  लढा देत असतो याची जाणीव करून दिली त्यावेळी प्रसिद्ध व्याख्याते व निवेदक मा श्री राजाराम सावंत यांनी अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करत असताना पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं काम हे  आरोग्य विभागाचे कर्मचारी सातत्याने करत असतात परंतु त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा काम नितीन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जागृत नागरिक महासंघातर्फे सफाई कर्मचाऱ्यांना आकाश कंदीलाच्या रूपाने दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांच्या घराचा प्रकाश उज्वल करण्याचं काम करण्यात आले असे सांगितले यावेळी क क्षेत्रीय कार्यालय प्रशासन अधिकारी श्रीम सुनिता वायकर  उपस्थित होत्या तसेच सफाई कर्मचारी सुपरवायझर श्री श्याम शिरसाट यांच्यासह अनेक सफाई कामगारा व सुरक्षा कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सफाई कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला खऱ्या अर्थाने सामाजिक काम केल्याचा अभिमान वाटत आहे असे संस्थेचे अध्यक्ष नितीन यादव यांनी यावेळी बोलताना सांगून कक्षेत्रेय अधिकारी माननीय श्री अजिंक्य येळे साहेब यांनी या उत्कृष्ट अशा सामाजिक कार्यासाठी त्यांचा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले जागृत नागरिक महासंघाचे मावळ समितीचे अध्यक्ष दत्तात्रय काजळे, मच्छिंद्र गुजर, सुनील गुजर, तसेच महासंघाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे,सचिव राजू डोगीवाल, खजिनदार रोहिणी यादव, श्रीनिवास कुलकर्णी, अरविंद पांचाळ, सातारा जिल्हाअध्यक्ष प्रकाश पाटील, ओंकार भागवत, राजेंद्र कदम, राजश्री शिर्के, रघुनाथ हांडे ,दीपक नाईक ,प्रकाश गडवे , श्रीनिवास कुलकर्णी ,अडचूले, सुनील साळवे व पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button