संत ॲन्स स्कूल कॅम्प येथे संविधान दिन साजरा
विशेष प्रतिनिधी पुणे :- भारत देशाला मिळालेले संविधान हे पुस्तक नसून जिवंत दस्तावेज आहेत. संविधान म्हणजे देशाची राज्यघटना. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला परंतु आपल्या देशाकडे स्वतःची राज्यघटना नव्हती.
आपल्या देशाने २६ नोव्हेंबर १९४९ पासून राज्यघटना स्वीकृत केली. या राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाले असून संविधानाचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.
भारतीय राज्यघटना ही जगाच्या पाठीवरील सर्वात मोठी राज्यघटना आहे.
राज्यघटना तयार करण्यासाठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या राज्यघटनेमध्ये सर्वसामान्य नागरिकाला आपले हक्क मूलभूत कर्तव्य मिळवून दिले.
स्वातंत्र्य, समता ,बंधुता, आणि समन्याय आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे.
उद्देश समोर ठेवून संत ॲन्स स्कूल पुणे यांनी शाळेत संविधान दिन साजरा करण्याचे ठरवले.
ज्ञानमाता सेवाभावी संस्थेला या कार्यक्रमासाठी शाळेने आमंत्रित केले होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक आब्रहाम आढाव यांनी संविधान आणि मी या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जनजागृती केली.
सामूहिक संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांनी वाचले.
शाळेचे प्रिन्सिपल आणि शिक्षक यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.
शाळेचे प्रिन्सिपल यांनी ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे विशेष आभार व्यक्त केले. या
कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल लैला डिसूजा, एव्हिलिन डायस, सरोज जाधव, कल्याणी काळे ,मोनिका जॉर्ज, संदेशा देठे आणि इतर शिक्षक उपस्थित होते.