क्राईमजळगावमहाराष्ट्र
एरंडोल तहसीलदारांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर.

एरंडोल: गिरणा नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार घुले, मंडल अधिकारी भरत पारधी, तलाठी राहुल अहिरे, मनोज सोनवणे यांच्या पथकाने उत्राण गावापासून थोड्या अंतरावर हनुमंत खेडे सिम या परिसरात वाळूने भरलेला विना नंबर प्लेट डंपर तीन ब्रास वाळू सहित चौकशी अंती पकडला.सदर डंपर तहसील कार्यालयत जमा करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.