मतदारसंघातील विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहील.-आमदार अमोल पाटील.
प्रतिनिधी एरंडोल – पाच वर्षात मतदारसंघात करोडो रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून
अनेक विकासकामे पूर्ण झाले आहेत,आगामी काळात देखील मतदारसंघातील
विकासकामांची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास आमदार अमोल पाटील
यांनी व्यक्त केला.माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हणमंतखेडे बुद्रुक व मजरे येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या
भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी ग्रामस्थांच्यावतीने आमदार अमोल
पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार अमोल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून
मतदान करून आशीर्वाद दिल्याचे सांगितले.मागील पाच वर्षात आमदार चिमणराव
पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात सुमारे तीन कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवली असून त्यातील अनेक कामे
पूर्ण झाले असल्याचे सांगितले.विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात झालेल्या
विकासकामांमुळे मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवून विजयी केले असून मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाची परतफेड विकासकामांच्या माध्यामातून करण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार अमोल पाटील यांचेहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आमदार अमोल पाटील यांचा सत्कार करण्यातआला.कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,जिल्हापरिषदेचेमाजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील यांचेसह परिसरातील आजीमाजी सरपंच,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.