*चारचाकी वाहनाची दुचाकीला समोरून धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी…….!*

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल कासोदा रस्त्यावर ७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एरंडोल पासून ५ कि.मी.अंतरावर एका चारचाकी गाडीने उलट दिशेने जाऊन मोटारसायकलला धडक दिली.त्यात पतराळ,ता.भडगांव येथील गॅस सुरक्षा एजन्सीचे अर्जून दिलीप पाटील हे गंभीर जखमी झाले.दुचाकीस्वारअर्जून पाटील हे एरंडोल येथील काम आटोपल्यावर कासोदा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले असता समोरून चारचाकी गाडी त्यांच्या अंगावर येऊन धडकली.त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना, डाव्या पायाला व डोक्याला मार लागला.अर्जून पाटील हे सध्या जळगांव येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दुचाकीचा क्रमांक एम एच १४/ एल आर १७२५ तर चारचाकी गाडी क्र.एम एच १९ बी जे ४१८१ असा आहे.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला या दुर्घटनेबाबत ११ ते १२ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.