जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र
प्रमोद पाटील चिलाणेकर यांची जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड.

प्रतिनिधी एरंडोल:-तालुक्यातील कासोदा येथील स्वर्गीय आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी फ्रुट सेल संस्थेचे संचालक प्रमोद पाटील चिलानेकर यांची जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली. चिलानेकर हे आडगाव येथील धनराज पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शालेय समितीचे सचिव पदाचे धुरा सांभाळीत आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचेवर सर्वत्र अभिनंदन असा वर्षाव होत आहे