जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल केंद्रावर एका विद्यार्थ्यावर मराठीच्या पेपरला कारवाई.


प्रतिनिधी एरंडोल :- येथे डी डी एस पी महाविद्यालयातील बारावी बोर्ड परीक्षेच्या केंद्रावर एका विद्यार्थ्याजवळ कॉपी आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अशी माहिती तालुका गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन यांनी दिली. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे.
                 एरंडोल येथे डीडीएसपी महाविद्यालयाच्या बारावी बोर्ड परीक्षा  केंद्रावर मराठीच्या पेपरसाठी एकूण ५२९ विद्यार्थ्यांपैकी ५२३ विद्यार्थी मराठीच्या पेपरला हजर होते तर ६ विद्यार्थी गैरहजर होते. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या पथकाने एरंडोल परीक्षा केंद्राला भेट दिली असता. एका विद्यार्थ्याचे तपासणी केली असता त्याच्याकडे कॉपी आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button