शैक्षणिक

पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये  वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे विविध आविष्कारमय प्रयोग सादर करून  सफलपूर्वक आयोजन

प्रतिनिधी अमळनेर – पी.बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये थोर  जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक, हिंदुस्थानाला वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये जागतिक ओळख प्राप्त करून दिलेले डॉ. सी.व्ही. रमण यांची जयंती विज्ञान दिवस म्हणून उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात तसेच नानाविध अविष्कारमय प्रयोग सादर करून सफलपूर्वक स्वरूपात साजरा करण्यात आला.
     सकाळच्या मंगलशुभप्रसंगी सदर प्रदर्शनीचे रंगारंग स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे विद्यार्थी उपरोक्त कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात मंचावर स्थापित *मां सरस्वती व शास्त्रज्ञ *सी.व्ही. रमण* यांच्या प्रतिमेस माल्यार्पण  व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे चेअरमन श्री. प्रदीप जी. के. अग्रवाल, विज्ञान क्षेत्रातील नामांकित तज्ञ अधिष्ठाता प्रा डॉ. श्री ए.जे. पाटील, प्रा. श्री अमोल मानके, प्रा.सौ. एम. एस. पाटील, प्रा.सौ.जे.आर. पाटील उपस्थित होते. त्यानंतर मान्यवर अध्यापक मंडळी यांनी आजच्या तांत्रिक युगात वैज्ञानिक दृष्टिकोन व तिची कास कशाप्रकारे व आस का धरावी, तिचा उपयोग हिंदुस्तानाला कशाप्रकारे महासत्ता बनवू शकते याचे अतिशय अलंकारिक भाषेत मनोगत भाव व्यक्त केले. सदर प्रयोगाची मांडणी तिचे नियोजन आयोजन संचलन हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवणे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात अविष्कार प्रयोगाप्रती आवड निवड वाढवणे, जिज्ञासा मनोभाव दृढ स्वरूपात रुजवणे हा एक सकारात्मक भाव हा प्रदर्शनी मागे होता. तो भाव व विषय विद्यार्थ्यांनी प्रयोग मांडणी द्वारा सार्थक ठरवला होता. सदर कार्यक्रमासाठी आमंत्रित परीक्षक म्हणून प्रा. डॉ. श्री ए. जे. पाटील व माननीय प्रा. श्री. अमोल मानके हे इयत्ता पाचवी ते नववी या वयोगटासाठी आपले परीक्षक म्हणून कार्य केले तसेच इयत्ता पहिली ते चौथीसाठी प्रा.सौ. एम. एस. पाटील व प्रा.सौ. जे. आर. पाटील यांनी परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे नानाविध वैविध्यपूर्ण प्रयोगाची तोंड भरून स्तुती करून त्यांनी मनोगतातून भारताचे खरे वैज्ञानिक यातूनच निर्माण होणार अशा सदिच्छा शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी शाळेच्या शिक्षिका योगिनी ओवे यांनी सांभाळली.
    सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री. प्रदीप जी. के. अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, डिंपल देसाई, व्ही.पी.बडवे, सुवर्णा भावसार, स्वाती माळी, श्रावण पाटील,प्रीती बडगुजर, योगिनी ओवे, योगिशा महाजन,  प्रशांत वंजारी, अशोक महाजन, लक्ष्मण पाटील सदर शिक्षकवृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button