एरंडोल वकील संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड जाहीर.

प्रतिनिधी एरंडोल;-येथे १३ फेब्रुवारी २९२५ रोजी एरंडोल वकील संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात होऊन नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली . अध्यक्षपदी एडवोकेट मनोहर मधुकर महाजन व सचिव पदी एडवोकेट आकाश निंबाजी महाजन तर सहसचिव म्हणून एडवोकेट प्रेमराज पाटील याप्रमाणे निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी व सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात आली तर सहसचिव यांची अगोदरच बिनविरोध निवड करण्यात आलेली होती. अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक गुप्त मतदान होऊन घेण्यात आली. उत्साहात मतदान पार पडले. मतदान अधिकारी म्हणून एडवोकेट अशोक आबाजी पाटील, एडवोकेट विलास मोरे यांनी काम पाहिले, त्यांना ग्रंथपाल प्रदीप जाधव व टायपिस्ट विजय पवार यांनी सहकार्य केले. अध्यक्षपदी एडवोकेट मनोहर महाजन व सचिव पदी एडवोकेट आकाश महाजन हे निवडून आले. त्यांच्या निवडीबद्दल वकील संघाच्या सर्व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.