क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅफे सेंटरवर कारवाई करा.पालकांची मागणी.



प्रतिनिधी एरंडोल – शहरात नवीन बसस्थानकासमोर तसेच म्हसावद रस्ता व अन्य ठिकाणी बिनधास्तपणे सुरु असलेल्या कॅफे सेंटरवर अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन
विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून सदर कॅफे सेंटरची तपासणी करून कारावाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.कॅफे सेंटरवर सुरु असलेल्या विविध प्रकारांबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

      शहरातील नवीन बसस्थानकासमोरील व्यापार संकुलासह अन्य ठिकाणी सुरु असलेल्या कॅफे सेंटरवर ठराविक वेळेस अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींची गर्दी होत असल्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.कॅफे सेंटर चालकाकडून वेळेनुसार रक्कम घेतली जात असल्याचे समजते.सदर कॅफेमध्ये विद्यार्थी चहा व कॉफी पिण्याच्या नावाखाली तासंतास थांबत असल्यामुळे पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.सदर कॅफेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वखुशीने येतात की त्यांची दिशाभूल
करून आणले जाते याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु आहे.कॅफेमध्ये केवळ एकच व्यक्ती गेल्यास कॅफे चालकाकडून त्यास प्रवेश दिला जात नसल्यामुळे सदर ठिकाणी अवैध व्यवसाय तर सुरु नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कॅफे सेंटर चालक व ठिकाणी कामा असलेल्या कर्मचा-यांकडून चौकशी करणा-यांना धमकावले  जाते.सकाळी अकरा वाजेपासून साडे बारा वाजेपर्यंत तसेच दुपारी चार वाजेपासून रात्री सात ते आठ वाजेपर्यंत कॅफे सेंटरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असते.विशिष्ट प्रकारच्या कोडचा अथवा शब्दांचा वापर करून कॅफेमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे बोलले जात आहे.यापूर्वी चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफे सेंटरवर धाड टाकून त्याची तोडफोड केली होती,अशाच प्रकारची कारवाई शहरात सरू असलेल्या कॅफे सेंटरवर करण्याची पालक वर्गाकडून केली जात आहे.कॅफे सेंटरवर सुरु असलेल्या अविध
व्यवसायांकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.याबाबत संबंधित अधिका-यांनी त्वरित दखल घेवून सदर कॅफे चालकांवर अचानक तपासणी करून संबंधितांविरोधात कारवाई करण्याची
मागणी पालकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button