हनुमान नगर येथे हनुमान व महादेव मंदिराचे प्राणप्रतिष्ठा उत्सव उत्साहात साजरा …

प्रतिनिधी एरंडोल:- शहरातील हनुमान नगर येथे हनुमान व महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न झाले. होम हवन मंत्र उपचारांच्या गजरात हनुमान नगरवासीयांनी यज्ञा करता आपला सहभाग नोंदविला. यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. वसाहतीतील सर्व महिलांनी मिळून महादेव मंदिरासाठी तर पुरुष मंडळींनी हनुमंत मंदिर उभारण्या कामी आपला सहभाग नोंदविला.
शहरातील आमदार अमोल पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रा. मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, गजानन पाटील ,भगवान महाजन संतोष महाजन , दशरथ पाटील रामचंद्र गुजर, या आश्चर्यदात्यांचे मंदिर उभारणे कामी योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ बोरसे, डॉ .अरविंद बडगुजर,गोरख पाटील, आर झेड पाटील, चंद्रकांत बाविस्कर, ज्ञानेश्वर पाटील,संजय पाटील ,योगेश बियाणी, मंगल सिंग पाटील, पि.यू.पाटील, सुनील शिंदे, अरुण पाटील ,ईश्वर पाटील, आर पी पाटील ,योगेश पाटील, मनोज पाटील, विष्णू वाणी सिताराम महाजन, नामदेव महाजन राजेंद्र कापसे, देवदत्त पाटील ज्ञानेश्वर पाटील 22 देवरे मंगेश शिंदे रोहित शिंदे दीपक बाविस्कर ,राहुल राजपूत अतुल सोनार ,देवेश रखमे ,निखिल पाटील यांनी मेहनत घेतली.