शिवजयंती निमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची प्रभात फेरी एरंडोल शहरात संपन्न

प्रतिनिधी – एरंडोल,शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शहरांमध्ये प्रभात फेरी निघाली या प्रभात फेरीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मावळ्यांची वेशभूषा तर काही लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत इयत्ता आठवीचा पियुष महाजन तर मावळ्यांच्या वेशभूषेत श्रेयश खैरनार,कृष्णा मोराणकर ,ओम पाटील , हे विद्यार्थी होते.व घोड्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक पूर्ण एरंडोल शहरात काढण्यात आली , शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन , व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या हस्ते करून पुढे मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकी दरम्यान विविध घोषणांनी एरंडोल शहर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जनतेला ऐकवलं मुली मराठमोळ वेशभूषा मध्ये मोठ्या आनंदाने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या,लेझीम पथकाने आपल्या लेझीम नृत्यावर एरंडोल वाशीयांना मंत्रमुग्ध केले, या प्रभात फेरीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
लिटल वंडर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव प्रचंड जल्लोषात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव पवार, संचालक विजय पाटील, प्राचार्य शितल पवार, रमेश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम कु. योगिता महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नर्सरी वर्गातील मिताली देशमुख हिने शिवाजी महाराजांवर पोवाडा गायन केला. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. सूत्रसंचालन प्रणव पाटील यांनी केले आभार प्रदर्शन सौ ज्योती महाजन यांनी केले.