जळगावमहाराष्ट्र

धरणगाव रस्त्यालगतच्या मार्बलच्या दुकानास आग लागल्याने लाखोंचे नुकसान….!

प्रतिनिधी एरंडोल – येथे शहराच्या बाहेरच्या भागातील धरणगाव रस्त्यालगतच्या श्री बजरंग मार्बल ग्रॅनाईट या दुकानाला १९ फेब्रुवारी २०२५ रोजी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने बांधकाम उपयोगी वस्तू, फर्निचर व इतर सामान जळून खाक झाले. या आगीमुळे सुमारे १८ ते २० लाखांचे नुकसान झाले.तर शेजारच्या श्री मोटार्स या दुकानालाही आगीची झळ बसल्याने तेथील वाॅशिंग मोटार,वायरी, सेन्टेक्स टाक्या व इतर साहित्य जळून खाक झाले.त्यामुळे श्री.मोटार्स चे मालक दिनेश बडगुजर यांचे जवळपास ३ लाखांचे नुकसान झाले.असा पंचनामा करण्यात आला आहे.
         शाॅर्टसर्कीटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.या आगीवर नियंत्रण करण्यासाठी एरंडोल नगरपालिका व धरणगाव नगरपालिका अग्निशमन बंबाने २ तास अथक परिश्रम करून आग नियंत्रणात आणली.

  याप्रसंगी एरंडोल मार्बल असोसिएशन चे सर्व सदस्य , परिसरातील सर्व दुकानदार सोबत  पत्रकार सुनील ठाकूर हे श्री बजरंग मार्बल ग्रॅनाईट चे संचालक यांच्या मदतीला उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button