एरंडोलला सर्वधर्मसमभाव महिला मंडळातर्फे सहेल स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

विविध कार्यक्रमांसह बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन
एरंडोल – येथील सर्वधर्मसमभाव मंडळातर्फे सहेली स्नेह मिलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने श्री छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे होत्या. मनीषा पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर करून कार्यक़्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच बक्षिण वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी गिफ्ट प्रायोजिका छाया दाभाडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. नासिक येथील प्राजक्ता श्रीवास्तव, वंदना तिडके उज्वला पाटील यांनी महिलांना आरोग्याविषयी तर जळगाव येथील विजया काबरा, करुणा राजपूत, लता पाटील यांनी मोदी केअर उत्पादनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास जैन भाभी यांनी सहकार्य केले. मंडळाच्या सचिव शोभा साळी, आरती महाजन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी बहारदार शैलीत केले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा मीना मानुधने यांनी केले. उपाध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवरायांचा पाळणा सादर केला. यात मनीषा पाटील. रजनी काळे, शकुंतला पाटील यांनी देखील सहभाग घेत पाळणा सादर केला. भारती बियाणी, ममता बिर्ला, मीरा जाखिटे यांनी सासू सुनेची सुंदर अशी नाटिका सादर करून महिलांची मने जिंकली. नम्रता जाखिटे यांनी घेतलेल्या खेळात गौरी मानूधने, मीनाक्षी पाटील विजेत्या ठरल्या. यावेळी एरंडोल मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम-द्वितीय क्रमांक मिळविलेल्या उर्मिला पाटील आणि माधुरी भवार यांचा बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रजनी काळे, वंदना पाटील, शकुंतला पाटील, लता पाटील, वैशाली पाटील, उज्वला पाटील, शोभा पाटील, शोभा महाजन, आशा महाजन, निशा विंचुरकर, अन्नपूर्णा पाटील, बबिता वार, ज्योती काबरा, पुजा साळी, छाया निंबाळकर, मीना चौधरी, निाक्षी पाटील, गौरी मानुधने आदी उपस्थित होते.