तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये रा.ति.काबरे विद्यालयाचे घवघवीत यश.

प्रतिनिधी – एरंडोल येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 या वर्षाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये मेघना निलेश पाटील 800 मीटर (प्रथम क्रमांक) ,1600 मीटर मध्ये (द्वितीय क्रमांक), हर्षाली दत्तू पाटील थाळी फेक मध्ये (प्रथम क्रमांक), ज्ञानदा किरण उदमले गोळा फेक मध्ये (तृतीय क्रमांक) भावेश गांगुर्डे 200मीटर( प्रथम क्रमांक) ,कुलदीप चौधरी 200 मीटर (द्वितीय क्रमांक), पार्थ रविंद्र सोनार गोळा फेक(द्वितीय क्रमांक), रोशनी गोसावी व संघ रिले स्पर्धेत संघ( द्वितीय क्रमांक). विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजीव मणियार ,रा.ति.काबरे विद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन अनिल बिर्ला, संस्थेचे संचालक परेश बिर्ला व सतीश परदेशी मुख्याध्यापक एस.एस.राठी, उपमुख्याध्यापक पी.एच. नेटके, क्रीडा शिक्षक पी ए. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.