जळगावधार्मिकमहाराष्ट्र

माजी आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते अमरनाथ शिवलिंग प्रतिकृती चे उद्घाटन

प्रतिनिधी – एरंडोल येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी ईश्वरीय महाविद्यालय येथे महाशिवरात्रीनिमित्त अमरनाथ येथे दरवर्षी तयार होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाप्रमाणे यावर्षी अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती जनतेच्या  दर्शनार्थ तयार करण्यात आली असून त्याचे उद्घाटन मा.आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून महादेवाची आरती मा.आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
      यावेळी उद्घाटनपर संबोधन करताना मा.आ. चिमणराव पाटील यांनी प्रजापती ब्रह्मा कुमारी सेंटर येथे आल्यानंतर मनाला शांती ची अनुभूती होते तसेच येथे नम्रता हा गुण शिकावयास मिळतो. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत आमदार निधीतून एक हॉल निर्माण करण्यासाठी निधी दिला होता त्याच हॉलमध्ये बसून आज मला वेगळीच अनुभूती अनुभवयास मिळाली व यापुढे सुद्धा माझ्या परीने जे सहकार्य लागेल ते देण्यास मी नेहमी कटीबद्ध राहील असे प्रतिपादन केले .
     यावेळी प्रजापती ब्रह्माकुमारी सेंटरच्या पुष्पा दिदी यांनी शिवबाबा चे महत्व व शिवरात्री निमित्त केलेल्या अमरनाथ शिवलिंगाच्या प्रतिकृती बद्दल सविस्तर माहिती दिली.
     जळगाव सेंटरच्या मीनाक्षी दीदी यांनी शिव सोबत आत्मा कसा एकरूप करावा याविषयी ज्ञानामृत सांगितले.
     याप्रसंगी जगदीश ठाकुर , कुणाल महाजन , परेश बिर्ला , मयूर महाजन , गोटु ठाकूर, इंगळे सर , पवार बाबा , आंबा महाजन, श्रीकांत भाई , सेंटर च्या माता भगिनी उपस्थित होते.
प्राजक्ता हिने स्वागत गीत नृत्य करुन सादर केले.सुत्र संचालन डॉ. रेखा साळुंखे यांनी केले . आभार प्रदर्शन सविता दिदी यांनी केले.
       

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button