जळगावमहाराष्ट्र

सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा ” सोहळा मैत्रीचा “

प्रतिनिधी – पिंपळकोठा येथील सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील २००८ – २००९ च्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा ” सोहळा मैत्रीचा ” असा गेट टु गेदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी पी.बी.पाटील सर होते. व्यासपीठावर बी.एफ.पाटील , सौ. सी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
   शाळेची स्थापना १९९३ साली  झाल्यानंतर प्रथमच गेट टु गेदर कार्यक्रम साजरा करण्यात आल्याने सर्व शिक्षकांचा ऊर भरून आला होता. शिक्षकांना आपण दिलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थीनी चांगला प्रकारे केल्याने चेहर्यावर समाधानाचे भाव दिसत होते. सर्व  माजी विद्यार्थी विद्यार्थिनी  सरकारी नोकरीत ,  अधिकारी ,  शेतकरी ,  समाजसेवक असे घडलेले सर्व एकत्र आले होते. परंतु त्या दिवशी सर्वांना बालपण आठवत होते. त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजन करुन पुन्हा – पुन्हा भेट घेत राहू असे ठरवून एकमेकांना निरोप दिला.
    या प्रसंगी कृष्णा सोनार, कमलेश पाटील, प्रमोद पाटील , ज्ञानेश्वर पाटील , रवींद्र पाटील महेश पाटील , मंगल सिंग राजपूत , जयेश बडगुजर , प्रतिभा सोनवणे , रिंकू चौधरी , रूपाली पाटील , नूतन पाटील , समाधान पाटील यांनी गेट-टुगेदर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button