जळगावमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिवस संपन्न

प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रथम शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन सर , व्हॉइस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती, बुद्धीची देवता गणपती व वि .वा .शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. व या कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता आठवीचा विद्यार्थी श्रेयश खैरनार ने मराठी भाषेचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले ,तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी जयश्री साळी, राजश्री पाटील, अस्मिता वाणी, वैष्णवी पाटील, हर्षदा महाजन, देवयानी परदेशी, हर्षदा जाधव या विद्यार्थिनींनी आम्ही शिवकन्या या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर करून सर्वांची दाद मिळवली ,तर मराठी विषयाचे शिक्षक पी .डी .बोरसे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्व व वि .वा. शिरवाडकर यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर इयत्ता नववीच्या अनुश्री भालेराव व आकांक्षा इंगळे यांनी माय मराठी कविता आपल्या सुंदर अशा आवाजात सादर केली व शाळेचे प्रिन्सिपल यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेतूनच मराठी भाषेचे महत्व सांगितले व आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची आरुशी पाटील व मोनाली पाटील यांनी केले तर आभार उज्वला धनगर यांनी केले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button