क्राईमजळगावमहाराष्ट्र

आत्महत्या केलेल्या पित्याच्या खिशातील सुसाईड नोट वरून पित्याने मुलाचा खून केल्याचा उलगडा.


प्रतिनिधी एरंडोल: येथील वृंदावन नगरा मधील रहिवासी विठ्ठल पाटील वय 50 वर्ष या माजी सैनिकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. विशेष हे की माजी सैनिकाच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली असून त्यात त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील वय 22 वर्ष त्याने स्वतः त्याच्या मुलाची हत्या भवरखेडा नजीकच्या नाल्याजवळ केली‌ व त्या ठिकाणी प्रेत कुरले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
                  विठ्ठल पाटील यांना त्यांचा मुलगा हितेश हा छळ करीत होता तसेच त्यांना मारहाण देखील करीत होता याला कंटाळून माजी सैनिकाने पोटच्या मुलाची हत्या केली. असे सुसाईड नोट वरून उघड झाले आहे.
         दरम्यान अमळनेर येथील डीवायएसपी विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button