ताज्या बातम्या

शास्त्री दांपत्याने अन्नदान करून जोपासली समाजसेवेची परंपरा

प्रतिनिधी – एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे संचालक डॉ. विजय शास्त्री तसेच सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या हस्ते दि. 15 डिसेंबर रोजी जाणाऱ्या श्री साई गजानन संस्थान एरंडोल च्या सौजन्याने,एरंडोल ते शेगाव पायी वारी दरम्यान सकाळी भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमाने शास्त्री दांपत्याने वारी दरम्यान अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यंदा एरंडोल ते शेगाव या वारीचे 35 वे वर्ष होते. या वारीमध्ये एरंडोल चे हजारो भाविक भक्त दरवर्षी सामील होतात व मोठ्या उत्साहाने शेगाव येथे प्रस्थान करतात. वारीतील भाविक भक्तांनी शास्त्री दांपत्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. विजय शास्त्री तसेच सौ. रूपा शास्त्री हे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या वारीमध्ये अन्नदान करत असतात. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी प्रशांत निळे व विवेक पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button