लग्नाचे अमिश दाखवून शारीरिक संबंध केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास.
अमळनेर न्यायालयाने सुनावली शिक्षा

प्रतिनिधी अमळनेर-महिलेस लग्नाचे अमिश दाखवून जबरी शारीरिक संबंध केल्याप्रकरणी
आरोपी शिवनंदन शालिक पवार वय 36 रा. टोळी, ता. पारोळा यांस 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने काल दिनांक 28 रोजी सुनावली.
याबाबत पारोळा पो. स्टे. येथे गु.र5 .न. 206/2020, स्पेशल केस नं. 03/2021, गुन्हा कलम 306,376(2)ड,420,504,506 भा.द.वि. व अ.जा. अ.ज. 3 (डब्लू) (2) अधिनियम 1989 प्रमाणे गुन्हा दाखल होत, सदर गुन्हयामधील आरोपी यांने त्याच गावातील पिडीतेस लग्नाचे अमिष दाखवून जबरी शारीरिक संबंध केला. सदरची घटना दि. 08 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती,सदर खटल्याकामी आरोपीस 19 नोव्हेंबर 2020 रोजी अटक केली असून तेव्हापासून आरोपी जेलमधेच होता. अशा परिस्थितीत तदर्थ व अति. जिल्हा न्यायाधीष 1 सौ. सी. व्ही. पाटील यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड. आर. बी. चौधरी यांनी एकूण 26 साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी व तसेच मयत पिडितेची आई व बहिण यांना पिडीताने मरते समयी तोंडी मृत्यूपूर्व घडलेली घटना सांगितली त्यास पुरक असा जबाब धुळे यथील वैदयकिय अधिकारी आर. के. गढरी यांनी दिलेली साक्ष ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस भा.द.वि कलम 376. या कलमात 10 वर्षे शिक्षा व दंड 20 हजार अशी शिक्षा सुनावली. व इतर कलमातून आरोपीला निर्दोष मुक्त केले. याकामी पैरवी सहा. फौजदार अधिकारी, उदयसिंग सांळुके पारोळा पो. स्टे., पो.हे.कॉ. पु.शा. वाल्डे, अमळनेर पो.स्टे व पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, चोपडा शहर तसेच पो.कॉ. भरत इशी, मारवड पो.स्टे. व राहुल रणधीर चोपडा ग्रामीण पोलिस स्टेषन यांनी सहकार्य केले.