एरंडोल येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत १० टन कचरा संकलन……!

प्रतिनिधी एरंडोल – डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे येथे २ मार्च २०२५ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानात आडगांव, एरंडोल,कासोदा, खडके,भातखेडा,टोळी,रिंगणगांव,तळी,पिंप्री या गावांमधील ३९२ श्री सदस्य सहभागी झाले.या अभियानात १० ट्रॅक्टर्स,१ टेम्पो,२ छोटा हत्ती अशा वाहनांमधून जवळपास १० टन कचरा संकलीत करण्यात आला.या अभियानामुळे शहरात सर्वत्र प्रसन्न वातावरण तयार झाले.शहरात सर्वत्र स्वच्छता व साफसफाई करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.स्वच्छता मोहीमेची सुरूवात माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्या हस्ते रा.ति.काबरे विद्यालयापासून करण्यात आली.सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत हे अभियान अतिशय उत्साहाने पार पडले.
सदर वाहनांमधून १ टन ओला कचरा व ९ टन सुका कचरा नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.शहरातील मुख्य रस्ता, धरणगाव रस्ता,जुना धरणगाव रस्ता,कासोदा रस्ता, म्हसावद नाका परिसर, आठवडे बाजार परिसर,पुरा भाग इत्यादी प्रमुख ठिकाणांसह गल्ली बोळात मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.