कवी प्रवीण महाजन यांच्या प्यारे पापा या पोस्टर पोएट्रीचे जळगाव येथे प्रकाशन

प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक तथा कवी प्रवीण आधार महाजन यांच्या प्यारे पापा या हिंदी कवितेच्या पोस्टर पोएट्री चे प्रकाशन केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा चे संचालक तथा नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदचे निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव येथील मु.जे. महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय हिंदी पंधरवाडा कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे उपस्थितीत पोस्टर पोएट्री चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.भूपेंद्र केसुर, साहित्य भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष महाले, प्रा. डॉ. विजय लोहार, प्रा. डॉ. रोशनी पवार अधिक व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्री महाजन यांनी प्यारे पापा या कवितेचे वाचन केले. त्यांच्या या हिंदी पोस्टर पोएट्री चे मान्यवरांनी कौतुक केले. याप्रसंगी धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. योगेश पाटील, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल संदानशीव, प्रा. विनोद अहिरे, प्रा. अंकिता दुबे, उज्वला पाटील, रणजी आडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. विजय लोहार यांच्या रामावतार त्यागी और सुरेश भट या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ रोशनी पवार यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. विजय लोहार यांनी केले. आभार प्रा.डॉ. मनोज महाजन यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.