ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

निपाणे ग्रामपंचायत सरपंचपदी सुनिता वराडे बिनविरोध.

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील निपाणे येथील ग्रामपंचायत सरपंच संगीता भिकन पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी सुनिता हिम्मत वराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी उपसरपंच सुरेश भिल, सदस्या सुरेखा पाटील, संगीता पाटील, शालिनी ठाकूर, नीलिमा ठाकूर, बाळू महाजन, विजय सोनवणे, सरूबाई भिल उपस्थित्त होते. ग्रा.पं. सदस्यांनी नवनिर्वाचित सरपंच सुनीता हिम्मत वराडे यांचा सत्कार केला. वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर आमले, कमलेश पाटील, राजेंद्र पाटील, शरद ठाकूर, पांडुरंग बाविस्कर, भिकन पाटील, भारत पाटील, चेतन पाटील, श्रावण पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच सुनिता वराडे यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी एरंडोल कृषी विभागाचे विस्तार अधिकारी. व्ही. एस. साळुंके, तलाठी गजानन राजपूत यांनी निवडणूक काम पाहिले. कासोदा पो.स्टे. चे पो.कॉ. लहू हटकर, पोलीस पाटील भागवत हटकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button