श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात.

प्रतिनिधी एरंडोल – यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक 08 / 03 / 2025 रोजी महिला दिनाचा अवचित साधून सोहळा उत्साहात संपन्न झाले . प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण शिक्षक मंडळाचे व्यवस्थापक अमित दादा पाटील उपस्थित होते. व शाळेतील प्राचार्य श्री दीनानाथ पाटील सर कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ मानसी भावसार मॅडम , नूतन पाटील मॅम , भाग्यश्री चौधरी मॅम ,ममता सुतार मॅम उपस्थित होते
नर्सरी ते इयत्ता आठवी तील सुमारे 40 विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम तसेच नृत्य सादर करण्यात आले .
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी पलक पाटील व उर्वी सारंग भालेराव यांनी केले. तसेच ममता सुतार मॅडम व प्रणाली भोसले मॅडम यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आभार प्रदर्शन विद्यार्थिनी श्रावणी देसले हिने केले.
पालकांनी ही उत्सपूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. यावेळी शाळेचे प्राचार्य दिनानाथ पाटील सर,शेखर पाटील तसेच , रूपाली पाटील मॅडम ,माधुरी पाटील मॅडम, अर्चना मॅडम , भगवान महाजन, भिकन वाढले आशा शिंपी ,निशा ठोसर ,हर्षल पाटील तसेच शिक्षक वृंद व शीतल दुसे ह्या पालकांनी हजेरी लावली.