माहिती अधिकार महासंघाचे १४ सष्टेंबर रोजी सोलापूर येथे अधिवेशन, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रतिनिधी एरंडोल: सोलापूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सर्वात मोठी संघटना असून महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १४ सष्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ४.०० पर्यंत शिव छत्रपती रंगभवन, शांतीसागर महाराज चौक, सोलापूर येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनासाठी राज्याच्या ३५ जिल्ह्यातून सुमारे पाचशे माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विस्वास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते १४ सष्टेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता होणार रोजी होणार असून त्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही होणार आहे. हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, फेडरेशनच्या सोलापूर टीम ने जोरदार तयारी केलेली आहे.
शासन व प्रशासन पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त असावे व त्यांत नागरिकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूने अनेक समाज सेवकांच्या अविरत संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावीपणे राबवण्यिासाठी शासन व प्रशासन स्तरावर खूपच उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना हक्क व अधिकार देणारा हा कायदा शासनाला नकोच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी होणे व या कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज असून जागरूक व प्रमाणिक नागरिकाचा मोठा दबाव गट निर्माण झाला तरच माहिती अधिकार कायदा वाचणार आहे. हा कायदा वाचावा त्याचा तळागाळापर्यंत प्रसार व प्रचार व्हावा या साठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालूच आहेच असे सांगून या अधिवेशनामध्ये सोलापूर शहर व जिल्हयातील जागरुक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले आहे.