ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा.


एरंडोल (प्रतिनिधी) – येथील गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्था अध्यक्ष सचिन विसपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संघर्ष जितका कठीण असतो यश तितकेच गौरवशाली असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण उन्नती मंडळाचे अध्यक्ष सचिनजी विसपुते, माजी क्रीडा शिक्षक चौधरी सर, अंजुषा विसपुते, कुस्ती प्रशिक्षक आरखे सर, राज्यस्तर तसेच राष्ट्रीय स्तरावर कुस्ती व जुडो मध्ये विजयी झालेल्या यामिनी आणि प्रेरणा मराठे, मुख्याध्यापक ठाकरे सर, एस एच पाटील सर, वडगावकर मॅडम यांचेसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार दिवसाच्या या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी,खो-खो, चेस, कॅरम, बॅडमिंटन, रनिंग रिले, संगीत खुर्ची, फुटबॉल, लगोरी सारखे 23 क्रीडा प्रकार घेण्यात आलेत. स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण माजी क्रीडा शिक्षक डी एस पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देखील खिलाडी वृत्तीने सर्व क्रीडा प्रकारांचा आनंद घेतला. क्रीडा शिक्षिका रत्ना पटवारी यांचेसह शिक्षिका, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button