जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन परीसंवादाचे आयोजन.

प्रतिनिधी एरंडोल -येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचा विषय भारतीय अर्थव्यवस्थेतील चालू घडामोडी हा होता.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेतील चालू घडामोडी बद्दल माहिती व्हावी, त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेतील समस्यांची जाणीव व्हावी व त्यावर काय उपाययोजना करता येतील याची जाणीव व्हावी हा होता. सदरील परिसंवादासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय अमित दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विशाल करपे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील समस्या त्या समस्येवरील उपाय , आरबीआय नियोजन विभाग, नीती आयोग या सर्व घटकांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देखील दिली. या ऑनलाइन परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गाढे यांनी केले.तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय डॉ.आर. एस. वानखेडे यांनी करून दिला. या परिसंवादाला शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे.पाटील यांनी दिल्या तसेच या परिसंवादासाठी उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर हे उपस्थित होते. तसेच अर्थशास्त्र विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी बहुसंख्येने या परिसंवादासाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button