महाराष्ट्रशैक्षणिक

डि.डी.एस.पी महाविद्यालयात दुष्प्रवृत्तीची होळी……!
दुर्गुणांचा अंत करण्याचा निर्धार….!

प्रतिनिधी एरंडोल – येथे १३ मार्च २०२५ रोजी गुरूवारी हुताशनी पौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डि.डी.एस‌.पी. महाविद्यालयात संस्थाध्यक्ष अमित राजेंद्र पाटील व प्रमुख अतिथी सुधाकर तुकाराम पाटील ( माजी कृषी अधिकारी,आडगांव ) यांच्या हस्ते दुष्प्रवृत्ती व दुर्गुणांची होळी करण्यात आली.
     प्रारंभी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी समाजात अनेक वाईट प्रवृत्ती व दुर्गुण पसरत आहे.भ्रष्टाचार,अज्ञान,व्यसनाधीनता आणि हिंसाचार या गोष्टींमुळे व्यक्तीचे आणि समाजाचे पतन होते.अशा दुष्प्रवृत्तींचा अंत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन केले.यावेळी दुर्गूण व दुष्प्रवृत्तीं विरूद्ध शपथ घेतली.
      यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ अरविंद बडगुजर व प्रा.आर.एस.पाटील , प्रा.एन.बी.गायकवाड व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button