एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती सुरु,इच्छुकांची भाऊगर्दी.

प्रतिनिधी – एरंडोल येथील शासकीय विश्राम गृहावर आमदार अमोल पाटील यांच्या अध्येक्षते खाली एरंडोल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली सदर मुलाखती दोन दिवस चालणार आहेत.
मुलाखाती साठी मोठ्या प्रमाणात उत्साह होता.अनेक इच्छुक आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करीत होते.याप्रसंगी शहरातील एकूण ११ वॉर्ड पैकी वार्ड क्रं १,२,३,४,५,६,७,१०साठी मुलाखाती झाल्या तर उर्वरित ८,९,११ या वॉर्ड साठी १६/१०/२०२५ रोजी मुलाखाती घेण्यात येणार आहेत.यावेळी असंख्य इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर ६ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या.
यावेळी जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील,ज्ञानेश्वर आमले, तालुका प्रमुख रविंद्र जाधव,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगरसेवक रुपेश माळी,बबलू चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.