जळगावमहाराष्ट्रराज्य

पांडव नगरी उद्योजिका महिला मेळावा उत्साहात साजरा

प्रतिनिधी – ८  शमार्च जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोल मधील सर्व महिला मंडळाच्या वतीने पांडव नगरी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी  आमदार अमोल दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून मृणालताई पाटील होत्या.

    आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की महिला या एकाच वेळी अनेक काम उत्कृष्टपणे करू शकतात. कुटुंब सांभाळत असताना त्या लहान मोठे व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने करू शकतात. एरंडोल येथील सर्व महिला मंडळाचे कौतुक करत असताना त्या म्हणाल्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या व्यवसाय साठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे कार्य यांनी केले आहे.
   गीता परिवारातील रेखा ओम त्रिवेदी आणि शिल्पा काबरा यांनी गीतेचे 18 अध्याय कंठस्थ केल्याबद्दल व पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त घेतलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या विजेत्यांचे सुद्धा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन क्षमा साळी ह्यांनी केलें. प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील ह्यांनी केलें .तसेच मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शोभा साळी मॅडम, डॉ उज्वाला राठी , संध्या महाजन, रश्मी दंडवते, अंजुषा विसपुते, शकुंतला अहिरराव, शशी पांडे, चंद्रकला जैन, छाया दाभाडे , दर्शना तिवारी, आरती महाजन,वंदना कुलकर्णी, निशा विंचूरकर, नंदा शुक्ला,कोठवदे मॅडम, सपना शर्मा, मीना मानुधने, यामिनी महाजन ह्यांनी मेहनत घेतली. मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे खाण्याचे ,सजावटीचे स्टॉल लावण्यात आले होते. दिवसभर एरंडोल वासियांनी स्टॉलला भेटी देऊन भरभरून प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button