शास्त्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांची नाशिक येथील ग्लेनमार्क फार्मासिटिकल्स कंपनीला भेट

प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांनी नाशिक येथील ग्लेनमार्क फार्मासिटिकल या कंपनीला भेट दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणातील अभ्यासक्रमात कंपनी भेट या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री सचिव सौ. रूपा शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने ही भेट पार पडली. तत्पूर्वी ग्लेनमार्क फार्मासिटिकल चे उत्पादक व्यवस्थापक डॉक्टर किरण पाटील सर यांनी जवळपास ९० विद्यार्थ्यांना भेटीसाठी परवानगी दिली होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करून कंपनीमध्ये भेट देऊन कंपनीमध्ये औषधी कशाप्रकारे तयार केल्या जातात किंवा त्या तयार करत असताना कुठल्या कुठल्या समस्या येतात त्या समजून घेतल्या. टॅबलेट, कॅप्सूल,सिरप, ऑइंटमेंट, पावडर,जेल या विविध भागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. कंपनीचे एच.आर मॅनेजर श्रेया तिवारी यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे शैक्षणिक सहल प्रमुख प्राध्यापक मंगेश पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वळवी, प्रा. पूर्वा पापरीकर तसेच प्रा. कीर्ती पाटील यांनी कंपनीचे उत्पादक व्यवस्थापक डॉ. किरण पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल चाकण मार्गे रांजणगाव गणपती, महाबळेश्वर येथील थंड हवेची ठिकाणे, प्रतापगड, मुरुड जंजिरा किल्ला, रायगड, गणपतीपुळे, आणि काशीद बीच अलिबाग, जेजुरी या ठिकाणी गेली होती. या शैक्षणिक सहलीत एकूण ८१ विद्यार्थी व ०५ प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन मनमुराद आनंद लुटला. शैक्षणिक सहल प्रमुख म्हणून प्रा. मंगेश पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच सहलीचे यशस्वी नियोजन प्रा. मंगेश पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वडवी प्रा. पूर्वा पापरीकर आणि प्रा.कीर्ती पाटील यांनी केले. त्यासाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.