एरंडोल येथील बियर – बार असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…..

प्रतिनिधी – बियर – बार वरील ५% टक्क्यां वरुन १०% व्हॅट टॅक्स केला व वाढीव १५% वार्षिक परवाना नुतनीकरण फी वाढविल्याने एरंडोल तालुका बियर – बार रिटेल वाइन असोसिएशन तर्फे शासनाकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.

बियर – बार मधून मद्य विक्री वरती ५% व्हॅट टॅक्स होता. शासनाच्या वर्ष २०२३ च्या जीआर मध्ये तो टॅक्स १०% करण्यात आला. परमीट रूम धारकांना हा टॅक्स शासनाने लादल्यामुळे व्यवसाय करण्यास फार अडचणी येत असल्याने ह्या १०% टॅक्स मुळे व्यवसाय दिवसेदिवस डबघाईस जात आहेत परीणामी आमच्या व्यवसायावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. १०% टॅक्स कमी करून तो ५ % करण्यात या पहिल्या स्टेजला म्हणजे उत्पादन शुल्क जर २% वाढला तर शासनाचा खूप आर्थिक फायदा होईल. तसेच शासनाने वर्ष २०२५-२६ परवाना नूतनीकरणासाठी १५% वाढवलेली फी कमी करावी. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना एरंडोल बियर बार असोसिएशन चे पदाधिकारी व परवानाधारक उपस्थित होते.
