क्राईम
उमरदे येथे काट्या व फावड्याच्या दांडक्याने मारहाण सात लोक जखमी…

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील उमरदे येथे 6 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून वाद उपस्थित करून प्रकाश महिपत जाधव,सुभाष महिपत जाधव, विशाल महिपत जाधव, आकाश संजय जाधव, यांनी शिवीगाळ करत हातात काठ्या व फावड्यांचे दाडगे घेऊन हाता पायांना व डोक्यावर मारहाण केली या घटनेत सात जण जखमी झाले.
जखमींमध्ये धनराज लाला पवार संजय जगन जाधव आकाश सुरेश जाधव सुरेश गुलाब जाधव संदीप धनराज पवार बुरा जगन जाधव विजय वामन जाधव सर्व राहणार उमर दे यांचा समावेश आहे याप्रकरणी संजय जगन जाधव याने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक मोरे पुढील तपास करीत आहेत