*आषाढी एकादशी निमित्त एरंडोल येथे गुजर समाजातर्फे समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा जल्लोषात…….!*

प्रतिनिधी एरंडोल – येथे गुजर समाजातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी निमित्त समर्थ गोविंद महाराज यांची पालखी मिरवणूक वाजत गाजत शहरातून काढण्यात आली.या सोहळ्याला ३६ वर्षांची परंपरा लाभली आहे.पालखीत समर्थ गोविंद महाराज व विठ्ठल रूक्मिणी यांच्या प्रतिमांचे भाविकांनी पुजन केले.महिला वारकरींनी टाळ मृदुंग व विठ्ठल नामाच्या गजरात वाद्यांचा तालावर ठेका घेतला.शशिकांत पाटील यांच्या हस्ते पालखीची सपत्नीक पुजा होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली.पालखीची पुजा होऊन सवाद्य मिरवणूकीला प्रारंभ झाला.
जहाँगीर पुरा, बुधवार दरवाजा,मेनरोड मार्गे मिरवणूक जाऊन गुजर समाज मंदिरापर्यंत नेण्यात आली.त्या ठिकाणी समर्थ गोविंद महाराजांच्या प्रतिमा व ग्रंथासह विठ्ठल रूक्मिणीच्या प्रतिमांचे पूजन होऊन औक्षण करण्यात आले.
या मिरवणुकीत टाळ मृदुंगाचे वारकरी महिलांचे स्वतंत्र पथक या मिरवणुकीत सहभागी झाले.मिरवणुकीच्या सांगता प्रसंगी गुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या मिरवणुकीत गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील,सचिव प्रा.जी.आर.महाजन, प्रा.नितीन पाटील, प्रा.शरद महाजन,अरूण पाटील, डॉ.नरेंद्र पाटील,गोरख महाजन,माजी सैनिक कृष्णा महाजन, दिनेश पाटील, सदाशिव पाटील,रामा पाटील,शरद पाटील,दिनेश महाजन, सदानंद पाटील,जंगलू पाटील, अरविंद पाटील,जयश्री पाटील,संध्या महाजन,शोभा पाटील, शोभना साळी, नयना पाटील आदी सहभागी झाले.सर्वोदय गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ,ओम नमः शिवाय मित्र मंडळ या मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालखी सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.